पुण्यातील चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे हद्दीत पाषाण सर्कल येथे मद्यधुंद अवस्थेतील बाईकस्वारांनी हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारचालकास थांबवून जाेडप्याला मारहाण करत कारच्या काचा दगडाने फाेडल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. याप्रक
.
पाषण परिसरात रहाणारे एका कुटुंबातील पती व पत्नी हे त्यांच्या कारने पाषाण सर्कल येथून जात हाेते. त्यावेळी सदर ठिकाणी पाच ते सहाजणांचे एक टाेळके त्याठिकाणी थांबलेले हाेते. त्यांनी कार थांबवून सदर जाेडप्याला मारहाण केली. त्यांनी जाब विचारला असता त्यांच्या कारवर दगडफेक करुन काचा फाेडण्यात आला. याबाबत तक्रारदार केतकी भुजबळ म्हणाल्या, 18 एप्रिल राेजी रात्री सव्वाअकरा वाजता मी व माझे पती अमरदेव रमन हे मित्रांसाेबत जेवण करुन मुकुंदनगर येथून घरी परतत हाेताे. पाषाण सर्कल येथून नेहमीप्रमाणे आम्ही जात असताना, दुचाकीवर दाेनजण त्याठिकाणी हाेते. ते मद्यधुंद अवस्थेत हाेते आणि रस्त्याचे मधून गाडी चालवत असल्याने पतीने गाडीचा हाॅर्न वाजवला. त्यांनी राग येऊन पतीच्या बाजूचा कारचा दरवाजाची खिडकी उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांना रागाने पाहून आम्ही घाबरलाे. त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, तुम्ही हाॅर्न काेणाला पाहून वाजवला आहे.
तुम्ही रस्त्याचे मध्ये गाडी चालवू नकाे बाजूने चालवा असे सांगितले. परंतु त्यांनी आम्हाला काहीवेळ पुढे जाऊनच दिले नाही. अनेकवेळ त्यांनी अडवून धरल्याने आम्ही गाडी बाजूला घेऊन पती रस्त्यावर खाली उतरले. त्यावेळी दाेघांना विचारणा करुन तुम्हाला राग येण्याचे कारण काय? तुझ्यात काय खूप ताकद आहे का? तु आम्हाला मारहाण करणार का? असे म्हणत असताना मागून तीन ते चारजण त्याठिकाणी आले. त्यांनी पतीला पाठीमागून धरुन मारहाण सुरु केली.