[ad_1]
शिलाजितचे नाव ऐकताच याच सेवन फक्त पुरुष करतात असं सर्वसामान्य समज आहे. आयुर्वैदानुसार शिलाजित हे पुरुषांमधील कमजोरी दूर करण्यासाठी प्रभावी औषध मानले गेले आहे. शिलाजित पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी प्रभावी मानलं जातं. त्यामुळे शिलाजित हे पुरुषांसाठीच आहे असं सर्वसामान्यांना वाटतं. पण सोशल मीडियावर एका तज्ज्ञाने शिलाजित हे महिलांसाठी उपयुक्त आहे की नाही याबद्दल सांगितल आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर हे शिलाजित एखाद्या महिलेने खाल्ले तर? भारतीयांचा असा समज आहे की गरम गोष्टी, किंवा शरीराला उष्णता देणाऱ्या गोष्टी, महिलांसाठी चांगल्या नाहीत. पण हा गैरसमज महिलांना अनेक फायदेशीर गोष्टींपासून दूर ठेवतो. जर आपण शिलाजितबद्दल बोललो तर, एका आरोग्य तज्ज्ञाने सांगितले की जर एखाद्या महिलेने चौदा दिवस सतत शिलाजीतचं सेवन केले तर तिला तिच्या शरीरात चमत्कारिक बदल दिसून येतात.
एक औषध, अनेक फायदे!
अनेक गैरसमजांमुळे महिलांना शिलाजितपासून दूर ठेवले गेलं आहे. हे औषध फक्त पुरुषच घेऊ शकतात असे सांगण्यासाठी बाजारपेठ तयार करण्यात आली आहे. पण जर एखाद्या महिलेने चौदा दिवस सतत शिलाजितचे सेवन केले तर तिला चमत्कार दिसू लागतील. असे केल्यास काय होईल हे एका आरोग्य तज्ज्ञाने सांगितले आहे. त्यांनी सांगितले की जर एखाद्या महिलेने चौदा दिवस शिलाजितचे सेवन केले तर तिला फक्त चोवीस तासांत तिचे पोट आतून आकुंचन पावू लागेल. कारण शिलाजितमुळे तिचे चयापचय अधिक मजबूत होईल आणि चरबी वेगाने कमी होऊ लागेल.
आणखी फायदे काय?
शिलाजित घेतल्यापासून 72 तासांच्या आत, महिलेची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे ती हंगामी आजारांपासून दूर राहू राहते. दर महिन्याला महिलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो, आता त्यांना त्यातून आराम मिळू शकतं. शिलाजितचे सेवन करूनही ताणतणाव नियंत्रित करता येतं. महिलेची पचनसंस्था सात दिवसांत सुधारेल. त्याची पचनसंस्था मजबूत होईल. याशिवाय, शिलाजितचे सेवन केल्याने हृदयरोगांपासूनही आराम मिळतो. चौदाव्या दिवशी महिलेची त्वचा चमकू लागेल. शिलाजीतचे सेवन केल्याने मुरुमांपासूनही आराम मिळतो. याचा अर्थ असा की फक्त चौदा दिवस शिलाजितचे सेवन करणे महिलासाठी खूप फायदेशीर आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तज्ज्ञाने केला आहे.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
[ad_2]