[ad_1]
तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या चार वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत. या इमारतीच्या व्हरांड्यात विद्यार्थी शाळेच्या मधल्या वेळेत जेवणासाठी व सावलीसाठी वापर करत असल्याने याठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती पालका
.
रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून २७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्रांगणातील २५ ते ३० वर्षांपासून चार वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असून या चारही वर्गखोल्यांची भयानक दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छतावरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. याच धोकादायक वर्गखोल्यांच्या छताखाली विद्यार्थी जेवण करतात. कधी सावलीसाठी वापर करतात. या चार वर्गखोल्या धोकादायक असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतमार्फत ठराव करून त्या पाडण्यासाठी निर्लेखन प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी व पंचायत समितीकडे पाठवला आहे. सहा महिन्यानंतरही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. येथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत मुलांच्या जीविताचा विचार करत जीर्ण झालेल्या खोल्या पाडणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
^शाळेच्या चार वर्ग खोल्या धोकादायक आहेत. त्या पाडल्या पाहिजेत. ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने निर्लेखन प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करून सहा महिने झाले. धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यास प्रशासनाकडून मंजुरीस विलंब होत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. यास प्रशासनास जबाबदार धरले जाईल. -ॲड. हिरामण वाघ, रवळजी
[ad_2]