[ad_1]
शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून, तालुक्यातील प्रत्येक गावात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडून निधी आणला जाईल, असे आश्वासन आमदार काशिराम पावरा यांनी दिले.
.
तालुक्यातील पिळोदा येथे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्योगपती चिंतन पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे संचालक जे. टी. पाटील, घोडसगावचे सरपंच हुकूमचंद पाटील, भाजप युवा मोर्चाचे शिरपूर ग्रामीण अध्यक्ष योगेश बोरसे, पिळोदा ग्रामपंचायतीचे प्रशासक एस. एस. पवार आदी उपस्थित होते. आमदार अमरीश पटेल यांच्या प्रयत्नातून गावातील तलाठी कार्यालयासाठी २५ लाख, मातोश्री बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवन योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासाठी २५ लाख, आमदार अमरीश पटेल यांच्या निधीतून स्मशानभूमी बांधकामासाठी १० लाख, रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लाख, सामाजिक न्याय विभागातून दलित वस्तीत विद्युतीकरण करण्यासाठी १० लाख, आमदार काशिराम पावरा यांच्या निधीतून सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी २० लाख, पंचायत समिती सदस्य धनश्री योगेश बोरसे यांच्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३ लाख, गावात पोल व लाइट लावण्यासाठी ३ लाख रुपये, पीव्हीसी गटार बांधकामासाठी ३ लाख रुपये मंजूर झाले आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले.या वेळी भाजपचे शिरपूर शहराध्यक्ष चिंतन पटेल मनोगत व्यक्त केले.
[ad_2]