13 candidates from Marathwada have succeeded in UPSC, including 4 from Beed district, 3 each from Jalna and Latur, and 2 students from Nanded. | यूपीएससी निकाल: मराठवाड्यातून 13 उमेदवारांनी यूपीएससीत मिळवले यश‎, बीड जिल्ह्यातील 4, जालना अन् लातूरमधील प्रत्येकी 3, नांदेडच्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश‎ – Chhatrapati Sambhajinagar News

0



यूपीएससी परिक्षेचा निकाल‎मंगळवारी जाहीर झाला. या‎परीक्षेत मराठवाड्यातील १३‎जणांनी या परीक्षेत यश मिळवले.‎बीड जिल्ह्यातून ४, जालना‎आणि जिल्ह्यातून प्रत्येकी‎३ जण यूपीएससी उत्तीर्ण झाले.‎त्यानंतर नांदेड जिल्ह्यातून २,‎धाराशिव १ विद्यार्थी‎युपीएससीतून अ

.

एनआयटीमधून बी.टेक. पदवी,‎मात्र आयएएस होण्याचाच ध्यास‎

शहरातील अभिजय विजय पगारे‎यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण‎‎केली. दहावी व‎‎बारावीच्या परीक्षेत त्यांनी‎‎९६ टक्के मिळवले होते.‎‎तेलंगण राज्यातील‎‎वारंगळ येथील‎‎एनआयटीमधून बी.‎‎टेक. पदवी घेतली.‎‎२०२० मध्ये पहिल्यांदा‎‎युपीएससी पूर्व, मुख्य‎परीक्षा उत्तीर्ण केली, मात्र मुलाखतीत‎अपयश आले. आता दुसऱ्या प्रयत्नात यश.‎

जिल्ह्यातील तिघे होणार अधिकारी‎

उदगीर तालुक्यातील कृष्णा पाटील, जळकोट‎तालुक्यातील सुशील गिते आणि शहरातील संपदा‎वांगे हे तिघेही उत्तीर्ण झाले. कृष्णा पाटील यांना १९७,‎जळकोट तालुक्यातील चाटेवाडे येथील सुशील गिते‎यांनी ६२३, तर संपदा वांगे यांनी ८३९ रँक मिळवली आहे.‎एकाचवेळी जिल्ह्यातील तीन जणांनी यश मिळवले.‎

मोलमजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न साकारले‎

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील नितीन‎‎अंबादास बोडखे यांनी ६७७ रँक मिळवली.‎‎त्यांच्या बालपणीच वडील अंबादास बोडखे यांचे‎‎निधन झाले होते. त्यानंतर आई सुमन बोडखे यांनी‎‎मोलमजुरी करुन त्यांना शिकवले. ही परीक्षा उत्तीर्ण‎‎व्हावे, असे त्यांच्या आईचे स्वप्नत होते.‎

एमबीबीएस परीक्षेनंतर आता यूपीएससीतही डंका‎

भाटेपुरी येथील आकाश पुंजाराम गोरे यांनी‎‎यापूर्वी एमबीबीएस परीक्षेतही राज्यात १४ वा‎‎क्रमांक मिळवला होता. आता यूपीएससी परीक्षेतही‎‎त्यांनी ५०० रँक मिळवली. गेल्यावेळी अगदी‎‎कमी गुणांनी त्यांची संधी हुकली होती. परंतू निराश‎‎न होता पुन्हा जोमानेयश खेचून आणले.‎

स्पर्धा परीक्षेत यापूर्वी मिळवली‎दोन पदे, आता यूपीएससीत यश‎

वाशी | ८०० लोकसंख्येचे गावातून येत‎‎शेतकरी कुटुंबातील‎‎पुष्पराज खोत (२६)‎‎यांनी युपीएससीत ३०४‎‎रॅँक मिळवली. ते‎‎सध्या नांदेड येथे‎‎तालुका कृषी‎‎अधिकारी म्हणून‎‎कार्यरत आहेत. यापूर्वी‎‎त्यांनी बँक ऑफ इंडिया‎मध्ये सहायक व्यवस्थापक तर दिल्ली येथे‎एफसीआय मॅनेजर म्हणून देखील काम‎केले आहे. दहावीपर्यंत पायी शाळेत जात.‎ ‎


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here