[ad_1]
मुलीने घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन लग्न केले. त्याचा राग मनात ठेवून मुलीच्या घरच्या मंडळींनी तिचे अपहरण केले. तिला सोडवण्यास गेलेल्या जावयाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब तरुणाने दिला. याबाबत पोलिसांनी तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्य
.
या घटनेत जावई पवन अडसूळ सुमारे ५० टक्के भाजला असल्याची माहिती असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सासरा संजय गायकवाड, सासू व किशोर गायकवाड (रा. खंडेवाडी, पाटोदा शिवार) यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पवन अडसूळ (२५, रा. बार्शी, जि. सोलापूर) याची गायकवाड यांच्या मुलीशी मैत्री, नंतर प्रेम झाले होते. दरम्यान, दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी प्रेमविवाहही केला. मात्र, हे लग्न गायकवाड यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना याचा राग होता.
‘मी घरी नसताना सासरा व अन्य ६ जणांनी पत्नीचे अपहरण केले. त्याची पोलिस ठाण्यात तक्रार केली. काही दिवसांनी पत्नीने, मला घेऊन जाण्यास या, असा निरोप पाठवला. त्यामुळे मी मित्रांसह तेथे गेलो. त्या वेळी सासऱ्याने त्याच्या अंगावर कोयता फेकला. मात्र, त्याने तो शिताफीने हुकवला. त्यानंतर सासऱ्याने पवनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीचा गर्भपात करण्यात आल्याची माहिती त्या वेळी कळली. त्यानंतर मला पेटवून दिले.’ असे त्याने जबाबात म्हटले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्याने जबाब बदल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांकडून होणार आता मुलीची वैद्यकीय तपासणी
पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही चित्रीकरण हस्तगत केले. तो स्वत: जाळून घेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याची माहिती कळाल्यानंतर जावयाने जबाब बदलला. रागाच्या भरात स्वतःच जाळून घेतल्याचा जबाब दिला आहे. पत्नीचा गर्भपात केल्याचेही जावयाने जबाबात सांगितले होते. आता संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल भंडारे करत आहेत.
[ad_2]