[ad_1]
सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे शेती व प्लॉट विक्री करून राजिष्ट्री करण्याचे अमिष दाखवून 52.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 23 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता या दोघांचा शोध सुरु के
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे सय्यद युनूस याचे शेती व प्लॉट आहेत. समाईक क्षेत्र असलेल्या शेतीमधील 1 एकर 5 गुंठे शेती विक्रीसाठी काढली होती. सदर शेतीचा गावातीलच रामप्रसाद भगत यांच्यासोबत करार झाला होता. त्यानुसार 21 लाख रुपयांची अनामत रक्कम देखील सय्यद युनूस याने घेतली होती. त्यानंतर त्याने गावातील आणखी चार ते पाच जणांना प्लॉट विक्री करण्याचे सांगत पैसे जमा केले. तर एका महिलेस प्लॉट व शेती विक्री केल्यानंतर पैसे देतो असे सांगत त्या महिलेकडून 1.50 लाख रुपये व सोन्याचे झुमके घेतले.
दरम्यान, सदर सर्व प्रकार ता. 3 मार्च 23 ते ता. 15 ऑक्टोबर 24 या कालावधीत झाला. या सर्वांचे पैसे घेतल्यानंतर सय्यद युनूस हा कुटुंबियांसह फरार झाला. या प्रकरणात रामप्रसाद भगत यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरीकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी बैठक घेतली. यावेळी सय्यद युनूस याचा शोध घेऊन त्यालाही बोलावले होते. यावेळी त्याने काही जणांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. सदर पैसे परत करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली.
दरम्यान, सदर मुदत संपल्यानंतर रामप्रसाद भगत यांनी मंगळवारी ता. 22 रात्री सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामध्ये 52.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी सय्यद युनूस व अन्य एका विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शालीनी नाईक, जमादार आर. जी. जाधव, सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आता सय्यद युनूस व अन्य एकाचा शोध सुरु केला आहे.
[ad_2]