यावल तालुक्यातील न्हावी, आमोदा, हंबर्डी, कळमोदा, मारूळ, बोरखेडा परिसरात केळी हे मुख्य पीक आहे. मात्र, सुमारे पंधरवड्यापासून तापमान ४५ अंशांच्या आसपास असल्याने केळी पीक वाचवताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे.
.

मार्च महिन्याला सुरुवात होताच तापमान चाळिशीपर्यंत व आता ते ४५ अंशांच्या वर गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पिकाला पाणी दिल्यानंतर तापमानामुळे जमीन ते तत्काळ शोषून घेते. यामुळे नेहमीपेक्षा जास्त पाणी द्यावे. तसेच तसेच तापमानामुळे केळीची पाने सुकणे, खोड मोडणे असे प्रकार होत आहेत. अती तापमानामुळे केळीचे घड काळे पडणे, खोडातून सटकणे असे प्रकार होत आहेत. शिवाय फळाची गुणवत्ता घसरल्यास व्यापारी ते खरेदी करत नाही. यामुळे उष्ण वाऱ्यांपासून केळीबागांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे. अनेकांनी बागेभोवती जैविक कुंपण, हिरवे नेट किंवा कापड लावले आहेत. बागेतील ओलावा टिकून राहावा यासाठी ही धडपड असल्याचे शेतकरी अमोल इंगळे यांनी सांगितले. तर वाढते तापमान, वातावरणात अचानक बदल होत असल्याने केळीचे घड पिवळे, काळे होणे, वजन कमी अशा समस्या येत असल्याचे शेतकरी नारायण कोलते म्हणाले.
प्रतिनिधी | दहिगाव सध्या केळीला मागणी नाही. भाव देखील पडले आहेत. यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी केळीपासून वर्षभर टिकेल असा घरगुती फराळ तयार करण्यावर भर दिला आहे. अनेक शेतकरी केळीच्या बारीक तुकडे करून ती वाळत घालून वर्षभर फराळ कामी उपयोगात आणण्याचा प्रयोग करत आहेत. तर काही शेतकरी चक्क गुरांना केळी खाऊ घालत आहेत. बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत केळीचा दीडपट पुरवठा आहे. शिवाय उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये ट्रकद्वारे केळी पाठवणे खर्चिक ठरत आहे. या प्रवासात तापमानामुळे केळीची गुणवत्ता खराब होऊन दुहेरी नुकसान सोसावे लागते. दुसरीकडे स्थानिक व्यापारी विनवण्या करून सुद्धा केळी कापण्यास तयार होत नाहीत. यामुळे वैतागलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळी गुरांना खाऊ घालणे सुरू केले. तर कोणी त्यापासून वेफर्स, केळी सुकवून त्याचे पीठ तयार करण्याचे प्रयोग चालवले आहेत.
कापणी झालेल्या केळीची बोर्ड भावाने खरेदी व्हावी ^ सध्या बाजारात केळीला मागणी असताना सुद्धा शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केली जाते. त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अनेकदा उत्पादन खर्च निघत नाही. शेतकऱ्यांची केळीची बोर्ड भावानुसार खरेदी व्हावी. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबेल. – शरद महाजन, चेअरमन, जे.टी.महाजन फ्रूटसेल सोसायटी