[ad_1]
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जबाब देंगे म्हणजे काय दोन चार मशिदी पाडणार का? हिंदू-मुसलमान करणार का, यापेक्षा हे लोकं काय वेगळे करू शकतात, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर बिहारच्या न
.
संजय राऊत म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्यासाठीगृहमंत्री जबाबदार आहेत. अमित शहा हे अपयशी गृहमंत्री असून त्यांनी राजीनामा द्यायला हवा. ते गँग चालवतात तसा देश चालत नाही. विचार करत देश चालवावा लागतो.
शहांचा संपूर्ण वेळ राजकारणातच जातो
संजय राऊत म्हणाले की, मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या अमित शहा यांचा पूर्ण वेळ राजकारण करण्यात जातो. गृहमंत्रालयाचा वापर केवळ विरोधकांना संपवण्यासाठी केला जातो. आपण दहशतवादी संपवत नाही तर देशाची लोकशाही संपवत आहात.
एकनाथ शिंदेंनी नाटकं बंद करावी
संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की जशास तसे उत्तर देणार म्हणजे नेमके काय करणार. त्यांच्या लोकांना घेऊन ते सीमेवर जाणार आहेत का? नेमके करणार काय जशास तसे उत्तर दिले असते तर 27 लोकांचे प्राण गेले नसते, ही नाटकं बंद करा. एकनाथ शिंदेंमध्ये दम असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांचा राजीनामा मागावा. देशाच्या इतिहासातील अपयशी गृहमंत्री कोण असेल तर ते अमित शहा हे आहेत.
धार्मिकद्वेषाच्या राजकारणामुळे हे घडले
संजय राऊत म्हणाले की, देश गुंडगिरी करत चालत नाही. धार्मिकद्वेषाचे जे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे त्यांचा हा परिणाम आहे. तुम्ही 24 बाय 7 राजकारण करण्यात अडकलेले असतात तुम्ही देशाचे संरक्षण काय करणार? पश्चिम बंगाल ते जम्मूपर्यंत धार्मिक द्वेषातून हे सर्व घडत आहे. सर्वपक्षीय बैठका घेऊन काही फायदा नाही. त्यांनी राजीनामा द्यायला हवा. हे राज्यकर्ते नसून टोळ्या चालवणारे लोकं आहेत.
अन् लोकांनाच स्वर्गात पाठवले
संजय राऊत म्हणाले की, 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता दिसून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की दहशतवादी मुक्त काश्मीर बनवू. हा भाग पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू आणि लोकांनाच स्वर्गात पाठवले. हे जे राज्यकर्ते आहेत ते लोकांना मुर्ख बनवत आहे.
लोढा मोदी-शहांचा निषेध करणार का?
संजय राऊत म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, त्यांचा निषेध मंगलप्रभात लोढा करणार का?, आता नेहरु पंतप्रधान नाही त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. जी लोकं गेली त्यांना जीवन पुन्हा मिळणार नाही. देशात सामान्य माणसाला सुरक्षा नाही ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना आहे. सामान्य माणूस मरत आहेत.
[ad_2]