[ad_1]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. तर संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोकण किनारपट्टीवर खबरदारी म्हणून चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तिन्ही जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर असून 24 तास गस्त सुरू करण्यात आली आहे.
सीमेवर पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न, जवानांनी डाव उधळला
जम्मू आणि कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न झाला. देशाच्या सुरक्षा दलांनी घुसखोरांचा हा प्रयत्न रोखला. तर यासोबतच किमान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती लष्कराने बुधवारी दिली. 23 एप्रिल 2025 रोजी, बारामुल्ला (उत्तर कश्मीरमधील) उरी नाला येथील सरजीवन या क्षेत्रातून सुमारे 2-3 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, असे चिनार कॉर्प्सने सकाळी 8 वाजता पोस्ट केले.
पुण्यातील व्यावसायिकाचे डोके, कान आणि पाठीत वार
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. संतोष जगदाळे यांच्या डोक्यात, कानात आणि पाठीत गोळ्या लागल्या. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
जगदाळे त्यांच्या कुटुंबासह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही होती. तिथे एक महिला नातेवाईकही होती. दहशतवाद्यांनी तिन्ही महिलांना सोडले.
जगदाळे यांच्या मुलीने सांगितले की, दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांना कलमा म्हणण्यास सांगितले होते आणि जेव्हा ते म्हणू शकले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हातात बंदुका घेऊन, दहशतवादी तंबूत लपलेल्या लोकांना शोधत होते आणि मारत होते. वाचा सविस्तर
[ad_2]