Jammu Kashmir Pahalgam Terror Attack Tourists From Kolhapur Survived Attack | दीड किलोमीटरमागे असतानाच झाला दहशतवाद्यांचा हल्ला: वेळेत न पोहोचल्याने थोडक्यात बचावले, दैव बलवत्तर म्हणून वाचलो; पर्यटकांची भावना – Kolhapur News

0

[ad_1]

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला समजला जात आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटन गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण हल्ल्यामुळे जम्मू का

.

कोल्हापूर येथील पर्यटक अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत घोडे न मिळाल्याने त्यांना पहलगाम येथे पोहोचायला उशीर झाला होता. पहलगामपासून दीड किमी मागे असतानाच दहशतवादी हल्ला सुरू झाला. ट्रॅव्हल्सच्या चालकाने हल्ल्याची माहिती देताच अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी माघारी परतले. सध्या कोल्हापुरातील हे सर्व पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत. दरम्यान, सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना परत आणण्याची कारवाई महाराष्ट्र सरकारकडून केली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील 6 मृतांचे मृतदेह आज महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत.

कोल्हापुरात मुस्लिम संघटनांकडून हल्ल्याचा निषेध

काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकात मुस्लिम संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मुस्लिम महिला हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्यांनी हल्ला केला त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच हिंदू-मुस्लिम यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे पहलगामच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याची कारवाई महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. तसेच मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर पर्यटक व नातेवाईकांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here