Protests at Alka Chowk in Pune; Opposition parties also protested | काश्मीर हल्ल्याचा भाजपकडून निषेध: पुण्यात अलका चौकात निदर्शने; विरोधी पक्षांनीही केला निषेध – Pune News

0

[ad_1]

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज अलका चित्रपटगृह चौकात शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.

.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल.

यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, पुण्यामध्ये काँग्रेस पक्ष ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व पतीत पावन संघटना यांच्या वतीने देखील कश्मीर हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

दहशतवाद्यांचा त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन बिमोड करण्याची गरज

आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, काल झालेला पहलगाम येथील हल्ला हा अत्यंत क्रूर होता, पर्यटकांना लक्ष करून मारण्यात आले, धर्म विचारूनही लक्ष करण्यात आले असे कळते.याचाच अर्थ काश्मिरी लोकांमध्ये दहशत पसरवणे, त्यांचा रोजगार, व्यवसाय संपवणे हा सुद्धा या दहशतवादी चा उद्देश स्पष्ट दिसतो. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवण्यामागे पाकिस्तान पुरस्कृत संघटनांचा हात असावा असे दिसते. या दहशतवाद्यांचा त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन बिमोड करण्याची गरज आहे. स्थानिक लोकांनी सुद्धा निषेध करायला सुरुवात केली आहे.काश्मीरमधील लोकांना शांतता हवी आहे. हुसेन नावाच्या एका व्यक्ती सुद्धा या पर्यटकांना वाचवताना मरण पावला आहे. ज्या भागात दोन हजार पेक्षा अधिक पर्यटक आहेत तिथे दहशतवादी सहज पोचतात हे गंभीर आहे.पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांचे हे उघड अपयश आहे, त्याची उत्तरे केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवीत. 370 कलम हटवने,नोटाबंदी यासारख्या मार्गाने सुद्धा हा दहशतवादाचा प्रश्न अजून सुटलेला नाही.या घटनेबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात देऊन पुढील कारवाईची माहिती सरकारने द्यायला हवी. दहशतवाद्यांविरोधात कारवाई साठी देशातील सर्व पक्ष आणि जनता सरकारच्या मागे उभी असेल.

गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल एक लाख 80 हजार एवढे सैनिक संख्या कमी झाल्याचे सांगितले जात आहे दुसरीकडे तात्पुरत्या स्वरूपातील अग्नीवीर योजना राबवली गेली आहे. त्याच्याविषयी अनेक प्रश्न आहेत या अग्नीवीर योजनेचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here