Forest Rights Act guide to be published | वन हक्क कायद्याची मार्गदर्शिका प्रकाशित होणार: डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. विजय एदलाबादकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 25 एप्रिलला – Pune News

0

[ad_1]

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर लिखित ‘सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वनराई संस्थेत पार पडणार आहे. शुक्रवार, दिनांक 25 एप्रिल 2025

.

भारतीय समाजव्यवस्थेच्या उतरंडीत तळाशी मानल्या जाणाऱ्या आणि सर्वार्थाने जंगलांवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी व इतर वननिवासी समुदायांच्या जीवनात नवसंजीवनी आणणारा वन हक्क कायदा २००६ आहे. या कायद्यानुसार प्राप्त झालेल्या जबाबदाऱ्यांचा व अधिकारांचा सुयोग्य वापर करण्यासाठी ग्राम स्तरावर वन हक्क समिती गठीत करणे आवश्यक आहे. या समितीने आपल्या वनहक्क क्षेत्रातील वनांसाठी वन संरक्षण व व्यवस्थापन योजना अर्थात वन कार्य योजना बनवणे अपेक्षित आहे. ज्याच्या आधारे ग्रामसभा त्या क्षेत्राचे व्यवस्थापन करू शकेल; परंतु ही कार्य योजना बनवण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अशा क्षेत्रातील ग्रामसभेच्या सदस्यांकडे असणे दुरापास्त आहे. म्हणूनच हे ज्ञान ‘सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना’ या पुस्तकरूपी मार्गदर्शिकेच्या स्वरूपात शब्दबद्ध करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर सिध्द झालेली आणि अनुभवसंपन्न ज्ञानावर आधारित प्रस्तुत मार्गदर्शिका जमिनीवर ‘वन कार्य योजना’ तयार करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट उपयुक्त पडावी, अशा पद्धतीने लिहिलेली आहे. त्यामुळे ती ग्रामसभांच्या वन संसाधनांशी संबंधित ग्रामविकास आराखड्याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरेलच. शिवाय वन हक्क समित्यांच्या सक्षमीकरणालाही हातभार लागणार असल्याची माहिती वनराई संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here