[ad_1]
स्व. मारुतरावजी घुले पाटील यांनी ग्रामीण भागात उभारलेल्या या शाळेमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांनी उच्चपदी जाऊन शाळेचा राज्यासह देशात नावलौकिक करावा, विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शालेय जीवनापासूनच शिक्षक
.
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव – ने संचलित श्री रामेश्वरदासजी विद्यालयातील मुख्याध्यापक अप्पासाहेब गोविंदराव म्हस्के हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून व सहशिक्षक रावसाहेब दादाबा चव्हाण हेही ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. या दोघांचा सेवापूर्ती कार्यक्रम विद्यालयात आयोजित केला होता. त्या प्रसंगी डॉ. घुले बोलत होते.
अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते.
घुले म्हणाले, स्व. मारुतरावजी घुले पाटील यांनी परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब व तळागाळातील गावातील नागरिकांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण मिळावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हातगाव येथे श्री रामेश्वरदासजी विद्यालयाची सुरुवात केली. १९९२ साली हादगाव येथे सुरू करण्यात आलेल्या या विद्यालयाने आजपर्यंत अनेक हुशार विद्यार्थी घडवले. शाळेचा नावलौकिकही झाला परिसरातील नागरिकांच्या मुला – मुलींना जिल्हा परिषद शाळेनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी पूर्वी दूर अंतरावर जावे लागत होते. त्यामुळे मुलींना ते शिक्षण घेणे शक्य होत नसल्यानेच मुली त्या वेळी शिक्षणापासून दूर रहात होत्या. मात्र त्याचा विचार स्व. घुले पाटील यांनी करून हादगावात विद्यालयाची निर्मिती केली. शाळेचा दर्जा आहे याच्यापेक्षाही वाढवण्यासाठी हादगावसह परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन डॉ. घुले यांनी केले. शिवाजीराव पाटील व डॉ घुले यांच्या हस्ते म्हस्के व चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कारभारी नजन, पंजाबराव पारनेरे, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र पाटील, पत्रकार संघटनेचे तालुका प्रमुख रावसाहेब मरकड, मोहनराव गलांडे, त्रिंबकराव जाधव, तेजस देवकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब कोकरे यांनी, सूत्रसंचालन सिकंदर शेख यांनी केले.
गरिबांची मुले उच्च पदावर काम करत असल्याचा अभिमान मुख्याध्यापक आप्पासाहेब म्हस्के म्हणाले, स्व. घुले पाटील यांनी या परिसरात आणलेल्या शिक्षणाच्या व ज्ञानाच्या गंगेत आम्ही एकरूप होऊन जे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले गेले आमच्यासाठी प्रेरणादायी व हिताचे ठरले. ज्येष्ठ शिक्षक रावसाहेब चव्हाण म्हणाले, स्व. घुले पाटील शेवगाव व नेवासा तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून राहिले. त्यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले याच विचारातून गोरगरिबांची मुले उच्च पदावर काम करीत असल्याने आम्हा शिक्षकांना अभिमान आहे.
[ad_2]