[ad_1]
पैठण एमआयडीसी ही संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाची एमआयडीसी असून येथील चितेगाव व आता बिडकीन डीएमआयसी मध्ये पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मैत्री कक्ष येथे बैठक पार पड
.
यावेळी आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की, पैठण व चितेगांव येथील एमआयडीसीच्या वाढीला ज्या अडचणी येत आहे. त्या दुर करुन येथे नवीन उद्योग वाढले पाहिजे यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी केली. पैठण एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आले तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. शिवाय बिडकिन डीएमआयसी मध्ये पैठण स्थानिकांना प्रथम रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे भुमरे यांनी सांगितले. पैठण व चितेगाव मधील आहेत त्या उद्योगात वाढ होऊन अधिकचा रोजगार कसा उपलब्ध होईल याचे नियोजन बैठक घेऊन करण्यात यावी आदी मागण्या केल्या.
[ad_2]