Rohit Pawar On Pahalgam Terror Attack, Sharad Pawar’s Nationalist Congress Party | पाकिस्तानमध्ये घुसून मारा, मात्र दहशतवाद्यांचा विषय संपवा: रोहित पवारांचा सरकारला पाठिंबा; म्हणाले- ‘मदत करणारेही मुस्लिमच होते’ – Mumbai News

0



दहशतवादाला धर्म नसतो, मात्र काही लोक याला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सरकारला पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारायचे असेल तर त्यांनी मारावे. सर्वांचा

.

या संदर्भात रोहित पवार म्हणाले की, पाकिस्तानमध्ये तुम्हाला घुसायचे असेल तर घुसून मारा. मात्र या सर्व दहशतवाद्यांचा विषय कायमस्वरूपी संपवायला हवा. मात्र काही लोक धार्मिक विषय घेऊन पुढे घेऊन जात आहेत. मदत करणारे देखील मुस्लिम होते, हे विसरता येणार आहे. यामध्ये धार्मिक विषय न धरता, दहशतवादाला जात आणि धर्म नसतो, हे लक्षात ठेवावे. सरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला तरी सर्व पक्ष आणि सर्व लोक या सरकार-सोबत राहतील, असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here