[ad_1]
Radish Health Benefits in Summer : शरीरात घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. अशावेळी बाजारात मिळणारी एक भाजी नक्की मदत करते. पण अनेकजण ही भाजी खाताना अनेकजण नाक मुरडतात अशावेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील ही भाजी खाऊ शकता.
अनेकजण आता डाएटकडे लक्ष देताना दिसतात. अशावेळी मुळा ही भाजी आवर्जून टाळली जाते. पण तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हाच मुळा अतिशय फायदेशीर आहे. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीरात हार्टचा धोका अधिक उद्भवतो. तसेच मधुमेहींसाठी देखील मुळा अतिशय फायदेशीर ठरतं. मुळ्याचे सेवन करुन वजन कमी करता येते.
मुळ्याचे फायदे
उन्हाळ्यात अनेकदा जेवण नकोसं वाटतं. अशावेळी Water Rich असलेल्या मुळ्याचा वापर करावा. उन्हाळ्यात कच्चा भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. डॉक्टर शरीर सुदृढ राहण्यासाठी कच्चा भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामध्ये मुळ्याचा समावेश आहे.
मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्व असतात. यामध्ये कमी कॅलरी, हाय फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहे. यामार्फत ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते. मूळा आरोग्यासाठी फायदेशीर असून ब्लड सर्क्युलेशनमध्ये चांगला परिणाम पाहायला मिळतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येते. पण ते घेण्यापूर्वी, कृपया एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हवामान बदलताच, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सर्वात जास्त परिणाम होतो. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता.
मुळा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता. मुळा तुमची झोप सुधारण्यास मदत करू शकते. मुळा खाल्ल्याने निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते.
मुळा कॅल्शियमने समृद्ध असतो. याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. मुळा खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला कमी भूक लागली असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता.
मुळा सॅलड
साहित्य – मुळा, शेंगदाण्याचे कुट, कांदा, मिरची, कोथिंबिर, डाळिंबाचे दाणे, लिंबू, मीठ, चाट मसाला
कृती – मुळा स्वच्छ धुवून घ्यावा. पांढरा भाग किसून घ्यावा. पाने बारीक कापून घ्यावीत. यामध्ये कांदा बारीक चिरलेला, मिरची, कोथिंबीर टाकावी. यावर डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट घालावा. वरुन लिंबू पिळावा. चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालावा.
[ad_2]