[ad_1]
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्किल डेव्हलपमेंट अॅड टीव्हीईटी (तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण)’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शुक्रवार, दि. २५ एप्रिल रो
.
महिलांच्या कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर देऊन कौशल्य विकास आणि टीव्हीईटी या क्षेत्रांमध्ये यूनेस्को चेअर स्थापन करण्याच्या मुख्य उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ.स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या यांनी दिली.
या परिषदेचे उदघाटन उदय सामंत मंत्री, उद्योग विभाग व मराठी भाषा व नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, वेद मणी तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसडीसी, युनेस्को-युनेवोक चे प्रमुख फ्रेडरिक ह्युबलर, युनेस्कोच्या नवी दिल्ली येथील दक्षिण आशियाच्या क्षेत्रीय कार्यलयाचे संचालक टिम कर्टिस, तसेच २० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, विविध राज्यातील व परदेशातील शिक्षण क्षेत्रातील ६०० हून अधिक प्रतिनिधी, विविध तंत्रनिकेतनांचे व व्यायसायिक शिक्षण संस्थांचे प्राचार्य, शिक्षक प्रतिनिधी इत्यादी उपस्थित राहतील.
या परिषदेच्या प्रमुख विषयांमध्ये टीव्हीईटी आणि प्रशिक्षणांच्या विविध पद्धती वृद्धिंगत करण्यासाठी उद्योगांची भूमिका, टीव्हीईटीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, शासन व शैक्षणिक संस्था यामधील भागीदारी, शिक्षक प्रशिक्षण आणि संस्थात्मक क्षमता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम, क्षमता वाढीसाठीच्या आंतरराष्ट्रीय पध्दती, स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित) मधील प्रशिक्षण व रोजगारांमध्ये महिलांचे प्रमाण वाढविणे, टीव्हीईटी चे डिजिटलायझेशन, उद्योजकता कौशल्ये व आर्थिक साक्षरता आणि हरित अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी टीव्हीईटी इत्यादींचा समावेश आहे.
[ad_2]