Grand procession organized in Pune on the occasion of Parshuram Janmotsav | परशुराम जन्मोत्सवानिमित्त पुण्यात भव्य शोभायात्रा आयोजन: केसरी वाड्यापासून शनिवारवाड्यापर्यंत 30 संस्थांचा सहभाग – Pune News

0

[ad_1]

हिंदूंचे आराध्य दैवत आणि भगवान विष्णूचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या वतीने मध्य पुण्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता केसरी

.

पत्रकार परिषदेला समितीचे प्रमुख पदाधिकारी विश्वजीत देशपांडे, मकरंद माणकीकर यांसह चैतन्य जोशी, मनोज पंचारिया, मयुरेश अरगडे, विश्वनाथ भालेराव, श्रीकांत जोशी, श्यामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सूर्यकांत पाठक म्हणाले, भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त यापूर्वी देखील शोभायात्रा काढण्यात आली होती. यंदा भगवान परशुराम यांच्या मूर्तीसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देखील शोभायात्रेत असणार आहे. याशिवाय काही लहान मुले क्रांतिकारक व संतांच्या वेशभूषा करून सहभागी होणार आहेत. सर्व हिंदू समाजाला सोबत घेऊन ही शोभायात्रा काढण्यात येत असून सर्व जाती बांधवांनी सहभागी व्हावे.

भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या अंतर्गत ३० हून अधिक संस्था व संघटना यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ब्राह्मण सभा, देवस्था ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र, परशुराम हिंदू सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, ब्राह्मण जागृती सेवा संघ, ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सेवा संघ वाघोली, याज्ञवल्क्य आश्रम, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ पुणे, चित्पावन अस्तित्व संस्था, क-हाडे ब्राह्मण महासंघ/ संघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, चित्पावन कट्टा, याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन, विप्र फाउंडेशन, गौड ब्राह्मण संघ, गौडा सारस्वत ब्राह्मण संघ, चित्पावन मित्र असोसिएशन, श्री राजस्थानी छ:न्याति विप्र मंडल पुणे, विप्र फाउंडेशन १२ बी झोन पुणे, अखिल भारतीय पेशवा संघटना यांसह अनेक संस्था व संघटनांचा सहभाग असणार आहे. तरी हिंदू बंधू भगिनींनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here