Maharashtra’s strong victory in the National Artistic Gymnastics Championship | राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचा दमदार विजय: वरिष्ठ महिला गटात रेल्वेवर २ गुणांनी मात; अनुष्का पाटीलला कांस्यपदक – Pune News

0



भारतीय हौशी जिम्‍नॉस्टिक्सअसोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र हौशी जिम्‍नॉस्टिक्स असोसिएशनच्या आयोजित राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्‍नॉस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्रसंघाने विजेतेपद पटकाविले. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखाय

.

बालेवाडीतीलश्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी ही स्पर्धा पार पडली. महिलांच्या आर्टिस्टिकजिम्‍नॉस्टिक्समधील वरिष्ठ गटाच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी थरारकलढतीत बाजी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मुंबईच्या अनुष्का पाटील व इशिता रेवाळे,ठाण्याची सारा राऊळ, पुण्याची शताक्षी टक्के, संभाजीनगरची रिद्धी हत्तेकर व मुंबईचीरुजुल घोडके यांनी महाराष्ट्राला हे सुवर्णयश मिळवून दिले. या गटात यजमान महाराष्ट्राला रेल्वेच्या मुलींनी तोडीस तोड लढत दिली. स्‍पर्धेचा पदक वितरण समारंभ ऑलिम्‍पिकपटूदिपा कर्माकर व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधिर मोरे यांच्‍या हस्तेझाला. यावेळी महाराष्ट्र हौशी जिमनॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, द्रोणाचार्यपुरस्‍कार प्राप्‍त विश्वेश्रर नंदी, मकरंद जोशी व स्पर्धा संचालक प्रवीण ढगे आदी मान्‍यवरउपस्‍थित होते.

अखेरच्याक्षणापर्यंत रेल्वेचा संघचं २ गुणांनी आघाडीवर होता. मात्र, त्यांची एक खेळाडू बॅलन्स करताना खाली पडली अन् हीच गोष्ट महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेशीठरली. रेल्वेला १२७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालने ११५.५५गुण मिळवित कांस्यपदक जिंकले. महिलांच्या वरिष्ठ गटात असमांतर बार्स प्रकारात महाराष्ट्राच्याअनुष्का पाटील हिने ९.४३३ गुणांसह कांस्यपदक जिंकले. या प्रकारात रेल्वेच्या करिश्माचाकरिश्मा बघायला मिळाला. तिने निर्विवाद वर्चस्वासह १०.५०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावरआपला हक्क सांगितला. दिल्लीची स्नेहा तारियल रौप्यपदकाची मानकरी ठरली.

साक्षी दळवीचा पदकांचा चौकार

आर्टिस्टिक जिम्‍नॉस्टिक्स ज्युनियरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात ठाण्याच्या साक्षी दळवीने महाराष्ट्रालाचार पदके जिंकून दिली. तिने वैयक्तिक ऑल राऊंड, फ्लोअर एक्सरसाईज व युनेवन बार्स याप्रकारात रौप्यपदकांची कमाई केली, तर वार्ल्टींग टेबल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. वैयक्तिक ऑल राऊंड प्रकारात साक्षी दळवीने ४०.७५० गुणांसह रौप्य पदकाची कमाईकेली.

त्रिपुराची श्रीपर्णादेबनाथ ११.८०० गुणांसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली, तर पश्चिम बंगालच्या तोरा सानी हिने११.७३३ गुणांसह रौप्यपदक जिंकले.

महाराष्ट्राला सर्वाधिक पदकांचा मान

यजमान महाराष्ट्राने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत २ सुवर्णांसह ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण सर्वाधिक १५पदकांची लयलूट केली. मात्र, रेल्वेने ४ सुवर्ण, ६ रौप्य व २ कांस्य अशी एकूण १२ पदकांसहगुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवित सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राचा संघ सातव्यास्थानी राहिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here