[ad_1]
तालुक्यातील निमगावखलू येथे डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनी उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी सांगवी फाटा येथील एका मंगल कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अरुण हुके यांच्या अध्यक्षतेखाली
.
हा प्रकल्प झाल्यास भीमा नदीच्या काठी बागायती भागातील शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून लावण्यात आला.
सिमेंट कंपनीविरुद्ध हरकती नोंदवताना शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फोडला. एकाही प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने कंपनीच्या व प्रशाासनाच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली.
शेतकऱ्यांचे असे आहेत आरोप
सिमेंट कंपनी झाली तर ४९ गावातील शेतीवर त्याचा दुष्परिणाम होईल..ऑक्टोबर २०२४ मध्ये कंपनीने एजंट, दलालांमार्फत बोगस माहिती जमवून प्रकल्प अहवाल तयार केला..अहवाल तयार करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही.. असे प्रकल्प औद्योगिक क्षेत्रात पाहिजेत पण बागायती भागात कंपनी उभारून शेतकऱ्यांना अन्याय होणार.. प्रकल्प झाल्यास केमिकल शेजारील भीमा नदीच्या पात्रातही जाऊन पुढे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीतही जाऊ शकतो.. केमिकल युक्त पाणी परिसरातील विहिरी व बोरवेलमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल..१२०० एकर जागेत वनविभागाच्या जंगलातील पशुपक्षी नष्ट होतील.
[ad_2]