[ad_1]
IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) 48 वा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC VS KKR) यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्लीच्या होम ग्राउंडवर कोलकाता संघाने विजय मिळवून 14 धावांनी सामना जिंकला. सामन्यानंतर दिल्लीचा खेळाडू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि केकेआरचा खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) हे समोरासमोर आले. दोघे एकमेकांसोबत संवाद साधत असताना कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. केकेआरच्या फलंदाजांनी 9 विकेट गमावून 204 धावा केल्या, आणि देखील विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला आणि त्यामुळे कोलकाताने स्पर्धेतील त्यांचा चौथा सामना जिंकला.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी सामना संपल्यावर सर्व खेळाडू मैदानात एकत्र येत एकमेकांशी बोलत होते. यावेळी कुलदीप यादव आणि रिंकू सिंह हे दोघे देखील समोरासमोर आले. दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरु होतं तितक्यात कुलदीपने मस्करीत रिंकू सिंहच्या कानशिलात लगावली. यावर रिंकू नाराज झाला नाही तर हसताना दिसला. तेव्हा पुन्हा एकदा कानशिलात लगावण्यासाठी कुलदीपने हात वर केला, पण तेवढ्यात रिंकूने चेहरा लपवला.
हेही वाचा : 29 व्या मजल्यावर हिटमॅनचं घर! 300000000 रुपये किंमतीच्या या घरात काय आहे खास? पाहा Inside Photos
पाहा व्हिडीओ :
Kuldeep yadav slaps rinku singh kuldeepyadav rinkusinghKKRvsDC ipl20225 imkuldeep18 pic.twitter.com/SEWAgGagwq
Bobby (Bobby04432594) April 29, 2025
पॉईंट्स टेबलमध्ये बदल :
दिल्लीच्या पराभवानंतर आता आयपीएल 2025 च्या प्लेऑफची रेस आता अधिकच रंजक झाली आहे. आयपीएल 2025 मध्ये सध्या पॉईंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नंबर 1 वर असून त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स पोहोचली असून ते +0.889 च्या नेट रनरेटने पुढे आहेत. गुजरात टायटन्सचा संघ नंबर 3 वर असून त्यांचा नेट रनरेट +0.748 असा आहे. तर चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सअसून त्यांचा नेट रेनरेट हा +0.362 आहे.
[ad_2]