[ad_1]
.
बार्शीटाकळी परिसरात गोवंशांच्या कत्तलीसाठी सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. बोलेरो गाडीतून निर्दयतेने क्रूरतेने बांधून नेत असलेले तीन गोवंश जातीचे बैल पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहे.
अकोलीवेस, बार्शीटाकळी येथील शेख रिजवान, नावाचा इसम बोलेरो पिकअप क्रमांक एम. एच. ४३ एम. के. २०७३ मधून तीन गोवंश जातीचे बैल पिंजरहून बार्शीटाकळीच्या दिशेने कत्तलीसाठी नेत आहेत, अशी माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश रामराव जोधारकर यांना मिळाली. ही माहिती त्यांनी तत्काळ एपीआय दीपक वारे यांना दिली. पो. कॉ. ईश्वर बोराडे, पो. कॉ. गोविंद सपकाळ यांनी नाकाबंदी करत बार्शीटाकळी मार्गावर रेडवा येथे बोलेरो गाडी थांबवली. गाडीत तीन बैल क्रूरतेने व निर्दयतेने बांधलेले दिसून आले. सदर बैलांमध्ये एक पांढऱ्या रंगाचा अंदाजे ९ वर्षांचा बैल (किंमत २२ हजार), दुसरा पांढऱ्या रंगाचा अंदाजे ६ वर्षांचा बैल (किंमत १८ हजार) आणि तिसरा लालसर रंगाचा अंदाजे ६ वर्षांचा बैल (किंमत १८ हजार) यांचा समावेश होता. एकूण गोवंशांची किंमत ५८ हजार रुपये
असून, वाहनाची किंमत ८ लाख रुपये आहे. वाहन चालक शेख रिजवान शेख रशिद (२४), रा. अकोलीवेस, बार्शीटाकळी याच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नव्हते. याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ अ, ५ ब तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गोवंशांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[ad_2]