[ad_1]
शेंदुरजना घाट । पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप २६ पर्यटकांना शेंदुरजना घाट येथे सर्वधर्मीय नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना चौक, गुजरी बाजार चौक येथून रॅली काढून या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला
.
ही रॅली गळाचे गोठान, राजकमल चौक, मलम शावली, गफ्फार चौक मार्गे मलकापूर आठवडी बाजार येथील सार्वजनिक झेंड्याजवळ आल्यावर येथे पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या २६ पर्यटकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, कँडल लावून सर्वधर्मीयांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडून या हल्ल्याचा जाहीर निषेध करत दहशतवाद्यांवर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वधर्मीय नागरिकांकडून करण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी नागरिक.
[ad_2]