Condolence meeting in Gangapur, Pachodla market closed, protest in Shiur, protest by observing a bandh in Pachod, traders observed a bandh in Ajanta | गंगापुरात शोकसभा, पाचोडला‎बाजार बंद, शिऊर येथे निषेध‎: पाचाेडमध्ये बंद पाळून केला निषेध, अजिंठ्यात व्यापाऱ्यांनी पाळला बंद‎ – Chhatrapati Sambhajinagar News

0

[ad_1]

फर्दापूर | जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बॅसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अजिंठा लेणी परिसरातील पर्यटन व्यावसायिकांनी तीव्र निषेध केला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सरकारने या हल्ल्याल

.

प्रतिनिधी | शिऊर/ गंगापूर जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २८ पर्यटकांना शिऊर येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर गंगापूर शहरात २४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागरिकांतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व जाती धर्मातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिऊर गावातील ग्राम सचिवालय येथे ग्रामस्थांनी एकत्र येऊन दोन मिनिटांचे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी जि.प.सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे, बबन जाधव, निलेश देशमुख, उपसरपंच नंदकिशोर जाध आदींसह ज्येष्ठ नागरिक, युवक, मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पहेलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या क्रूर कृत्याचा शिऊर येथील ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत निषेध केला. “हा केवळ पर्यटकांवरचा हल्ला नाही, तर मानवतेवरचा हल्ला आहे.

पाचोड | जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाचोड शहरात निषेध व्यक्त करत संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवत घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे व सरपंच शिवराज भुमरे यांच्या नेतृत्वात पाचोड चौकामध्ये या भ्याड हल्ल्याचा निषेध करून मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी याप्रसंगी उपसरपंच शिवाजी भालसिंगे चेअरमन जिजा भुमरे व ज्येष्ठ शिवसैनिक व व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here