[ad_1]
पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर असलेला मोबाईल स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणास वाई पोलिसांनी अटक केली आहे. शुभम दशरथ कांबळे (रा. जांभळी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. याप्रकरणी संकेत सुरेश चिकणे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यान
.
संशयित आरोपी शुभम कांबळे याने पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकुराचा मोबाईल स्टेटस ठेवला होता. त्याचा मित्र संकेत चिकने याने गुरुवारी (24 एप्रिल) सायंकाळी तो स्टेटस पाहिला. याप्रकरणी त्याने वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम कांबळे याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात संशयितानं मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचं आढळून आलं.
गुन्हा दाखल केल्यानंतर वाई पोलिसांनी संशयित शुभम कांबळे याला आज (शुक्रवारी) दुपारी अटक केली. त्याला दुपारी वाईच्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे हवालदार जितेंद्र शिंदे यांनी दिली. या गुन्हयाचं गांभीर्य पाहून वाईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे स्वतः या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या जात आहेत. त्यातून जातीय आणि धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक तेढ निर्माण होत आहे. यामुळं सातारा जिल्हा पोलिस दलाची वादग्रस्त पोस्टरवर करडी नजर आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे.
[ad_2]