[ad_1]
गेली काही दिवस उबाठाला गळती लागली आहे. उबाठाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे. यातच आता भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराला भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याने रा
.
जयकुमार गोरे म्हणाले की, लोक आपल्या निवडून देतात तेंव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण केल्या नाही तर लोक दुसरे कोणाचा तरी शोधत राहतात, असा इशारा त्यांनी पुण्यातील खेडमध्ये पार पडलेल्या पाणी परिषदेत आळंदीचे आमदार काळे यांना अप्रत्यक्ष दिला आहे.
नेमके गोरे काय म्हणाले?
जयकुमार गोरे म्हणाले की, लोक आपल्या निवडून देतात तेंव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण केल्या नाही तर लोक दुसरे कोणाचा तरी शोधत राहतात, त्यामुळे लोक कधीही बाभळीच्या झाडाखाली उभी रहात नाहीत. लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हेच शोधतात. त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा. 36 गावांतील ग्रामस्थांना जनतेच्या पाणीप्रश्नासाठी शासनदरबारी वकील म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले. आता त्यावर शिवसेनेचे बाबाजी काळे काय म्हणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी गोरेंनी दिला होता विरोधकांना इशारा
जयकुमार गोरे म्हणाले, आता मी बोलायचे नाही ठरवले आहे. पण, कार्यक्रम करायचे ठरवले आहे. अनेक जण मला आता सांगत आहेत की, माझा संबंध नाही. पण कोणी काय-काय केले आहे, त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात अनेक षड्यंत्र झाले. ते सगळे सहन केले. पण, शेवटचे षड्यंत्र माझ्या विरोधात झाले, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतोय एवढाच विषय आहे. अनेकजण देवेंद्र फडणवीस यांच्या जाऊन पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले. त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की, षड्यंत्र करणारा कधीही जिंकलेला नाही.
कोण आहेत बाबाजी काळे?
बाबाजी काळे हे आळंदी मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जवळपास 51 हजार मतांनी पराभव केला आहे.यापूर्वी त्यांनी सांडभोर-कलूस जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केले आहे.
[ad_2]