BSP’s reaction on Pahalgam attack in Kashmir, time has come to dismantle terrorist camps on the border – Dr. Chalwadi | काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावरून बसपाची प्रतिक्रिया: सीमेवरील दहशतवादी तळांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली – डॉ. चलवादी – Pune News

0

[ad_1]

देशाचे मुकूट अशी ओळख असलेल्या काश्मीर खोऱ्यातील ‘पहलगाम’ येथे पाक समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा केलेल्या नरसंहाराने अवघा देश स्तब्ध झालाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात बसप सहभागी आहे. पंरतू, सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक

.

डॉ. चलवादी म्हणाले की,’पुलवामा’ प्रमाणेच ‘पहलगाम’ येथील घटनेनंतर देशवासियांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोषाची लाट उसळली आहे. सीमाभागातील दहशवादी तळांचा कायमचा बंदोबस्त करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले कायमचे रोखण्यासाठी पीओके संदर्भात सरकारने योग्य निर्णय घ्यावा.पर्यटन काळात काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी,असे मत बसपाचे आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित या दुदैवी घटनेनंतर राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलत जनतेचा विश्वास बहाल करावा. देशात कुठेही अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी प्रत्येक भारतीयांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

पहलगाम हल्ला हा थेट दहशतवाद्यांकरवी छेडण्यात आलेले पाकिस्तान पुरस्कृत युद्ध आहे. केंद्र सरकारने या हल्ल्यानंतर घेतलेले निर्णय पाकिस्तान सोबतच्या संबंधांचे भविष्य निर्धारित करणारे आहेत.सरकारच्या भूमिका विरोधात पाकिस्तानात आगपाखड होतेय.परंतु, देशवासियांच्या सुरक्षेसह देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या प्रश्नावर कुठल्याही दबावाला सरकारने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here