[ad_1]
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र अयोध्या धम येथे 11 हजार आंबा आरास वा महानैवेद्य अक्षय तृतीय बुधवारी दि 30/04/2025 रोजी आयोजन श्रीराम भक्त विनायक भालचंद्र कांची परिवार पुणे यांनी केले आहे.
.
शुक्रवारी कै.किसनराव लक्ष्मण राव सिताराम काची (बुंदेले) फाउंडेशन, पुणे व पुणेकर श्रीराम भक्त श्री विनायक काची यांच्या अकरा हजार आंब्याचा ट्रक श्री क्षेत्र आयोध्या कडे रवाना करण्यासाठी नंदकिशोर तरूण मंडळात ‘श्रीं ‘ ची पुजन करून तसेच मीठ गंज पोलीस चौकी,आपला मारुती मंदिरासमोर ट्रक आणि आंब्याच्या पेटीचे पुजन करण्यात आले. यावेळी गिरीजा गिरीष बापट, स्थानिक आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले आणि 11 हजार आंबे व इतर फळे असलेला ट्रक भगवा झेंडा दाखवू श्री क्षेत्र आयोध्या च्या दिशेने प्रस्थान केले.
हेमंत रासने म्हणाले ,भाजपचे कार्यकर्ते आणि माझे सहकारी विनायक कांची यांनी अयोध्येतील श्रीराम लल्ला यांना 11 हजार आंबे आणि इतर फळांचा महाप्रसाद, भोग घेऊन निघाले आहे ही बाब प्रेरणादायी आहे. अयोध्येतील श्री रामलल्ला यांना माझी प्रार्थना भारतात आणि जगभरात रामराज्य स्थापन व्हावे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देऊन रामराज्य प्रस्थापित व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी आयोजक विनायक भालचंद्र कांची, आकाश मालव,राजेंद्र भोसले, विश्वास मानकर, डाँ गणेश परदेशी, माजी नगरसेवक अजित दरेकर, तीर्थ यात्रेचे आयोजक राजाभाऊ परदेशी, गणेश कांची मंगेश परदेशी उपस्थित होते.

[ad_2]