Assistance for victims of Pahalgam terror attack | पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी मदत: एलआयसीकडून विमा दाव्यांचा जलद निपटारा; मृत्यूचा पुरावा सरकारी नोंदींमधून स्वीकारला जाणार – Pune News

0

[ad_1]

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यांच्या दाव्याच्या निपटारा जलद करण्याची घोषणा केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या मृत्युबद्द

.

एलआयसी ऑफ इंडिया बाधितांना मदत करण्यास वचनबद्ध आहे आणि त्यांचे दावे त्वरित निकाली काढण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी माहिती एलआयसीने दिली आहे. दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, एलआयसीने दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.

मृत्यू प्रमाणपत्रांऐवजी, दहशतवादी हल्ल्यामुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यूचा सरकारी नोंदींमधील कोणताही पुरावा किंवा केंद्र किंवा राज्य सरकारांनी दिलेला कोणताही भरपाई मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारला जाईल. दहशतवादी हल्ल्यात मयत झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले आहे.अधिक मदतीसाठी दावेदार जवळच्या एलआयसी शाखा/विभाग/ग्राहक झोनशी संपर्क साधू शकतात.दावेदार एलआयसीच्या कॉल सेंटरवर देखील कॉल करू शकतात – ०२२ ६८२७६८२७. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा: कार्यकारी संचालक (सीसी) एलआयसी ऑफ इंडिया, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई. ईमेल आयडी: ed_cc@licindia.com www.licindia.in वर भेट द्या.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here