[ad_1]
कळवण व देवळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर धरणातून उजव्या कालव्याद्वारे शुक्रवारी (दि.२५) पाणी सोडण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रतिदिन ८ दलघफू प्रमाणे १२ दिवसात साधारण १०० दलघफू पाणी च
.
कळवण तालुक्यात व शेजारील देवळा तालुक्यात यंदा ऊन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पूर्व भागातील व टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी कळवण व देवळा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे केली होती.
या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चणकापूर धरणात असलेल्या पाण्यापैकी १०० दलघफू पाणी तत्काळ उजव्या कालव्याद्वारे सोडण्याचे आदेश दिले असून त्यानुसार चणकापूर धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.
कळवण तालुक्यातील मानूर, कळवण खुर्द, भुसणी, कळमथे, विठेवाडी, दह्याणे, निवाणे, भेंडी, जुनी भेंडी, बगडू या गावांतील व देवळा तालुक्यातील वरवंडी, वाजगाव, रामेश्वर, मटाणे, देवळा, गुंजाळवाडी, माळवाडी, सरस्वतीवाडी, फुलेमाळवाडी, खालप, लोहोणेर आदी २१ गावांचा पाणीप्रश्न एका महिन्यासाठी बहुतांशी सुटणार आहे.
^यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त ऊन वाढले आहे. यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. तसेच नदी-नाले पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आले असून या आवर्तनामुळे निश्चितच दुष्काळाचे सावट दूर होऊन दिलासा मिळेल. – शशिकांत पवार, संचालक, कृउबा समिती कळवण
[ad_2]