[ad_1]
उन्हाचा कडाका कायम असून, अहिल्यानगर शहर व परिसराचे तापमान शुक्रवारी (२५ एप्रिल) ४३ अंशावर होते. सोमवार (२१ एप्रिल) देखील शहराचे तापमान ४३ अंशावर गेले होते. एप्रिल-२०२२ मध्ये ४३.६ अंश तापमान झाले होते. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी एप्रिलमध्ये हे तापमान ४
.

मार्च महिन्यापासूनच शहराच्या तापमानात वाढ होऊ लागली. मार्चमध्ये शहराचे तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान होते. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ व अवकाळी पावसामुळे या तापमानात मोठी घट झाली. दोन एप्रिलला ढगाळ वातावरणामुळे हे तापमान ३५ अंशांवर आले होते. त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली. गेल्या १० दिवसांपूर्वी शहराचे तापमान ४० ते ४२ अंशावर गेले होते. सोमवारी प्रथमच शहराचे तापमान ४३ अंशावर गेले होते. त्यानंतर तापमानात कमी-अधिक प्रमाणात वाढ होत गेली. शुक्रवारी शहराचे तापमान ४३ अंशावर गेले होते. पुढचे ५ दिवस तापमानात वाढ कायम राहणार आहे. दिवसभर उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत होत्या. सायंकाळी मात्र काहीसे ढगाळ वातावरण तयार झाले होते. तीव्र उन्हामुळे बाजारपेठेतदेखील शुकशुकाट जाणवत होता. शहरातील रस्त्यावरदेखील तुरळकच वाहने धावताना दिसत होती.
[ad_2]