Dumper hits car at Nandgaon Peth 5 Injured | नांदगाव पेठ येथे डंपरची कारला धडक: कारमधील पाच जण किरकोळ जखमी, एअरबॅगमुळे वाचले प्राण; डंपरचालक फरार – Amravati News

0

[ad_1]

नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिझीलॅण्डसमोर शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता गिट्टी वाहतूक करणाऱ्या डंपरने क्रेटा कारला धडक दिली. या अपघातात कारमधील बलून कार्यान्वित झाल्याने पाच जणांचे प्राण वाचले.

.

मोर्शी येथील शैलेश प्रफुल्ल मालवीय हे त्यांचे वडील, जावई, बहीण आणि ३ वर्षांच्या मुलासह एमएच-२७-डीएल-२६१ क्रमांकाच्या क्रेटा कारने पुण्याकडे निघाले होते. रेवा हॉटेलसमोर एमएच-२७-डीटी ७०७७ क्रमांकाच्या गिट्टी वाहतूक करणाऱ्या डंपरने कारला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर कार दोनदा उलटून सरळ झाली. कार पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली. डंपरने पुलाची संरक्षक भिंतही तोडली. कारमधील पाचही जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पळून गेला.

नांदगावपेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांनी जखमींना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी तातडीने सोडवली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here