मोठी रक्कम जप्त,तडजोडी अंती त्या पंधरा जणांना पोलिसाने दिले सोडून दिले.
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी फँक्टरी येथिल एका मोठ्या जुगार अड्ड्याच्या क्लबवर नगर येथिल गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला यावेळी मोठी रक्कम व दहा पंधरा जणांना ताब्यात घेतले.परंतू राहुरी पोलिस ठाण्यात पोहचण्यापूर्वीच नगर मनमाड महामार्गावर त्या पंधराजणांना सोडून देण्यात आले.एका राजकीय व्यक्ती व मानवअधिकारी संघटनेचा पदाधिकारी याने पोलिसाने छापा मारला त्यावेळी शुटींग केली असता छापा मारणाऱ्या पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेवून तुच या क्लबचा मालक असल्याचे दाखवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी फँक्टरी येथे एक मोठा जुगार अड्डा स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असून स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करुनही स्थानिक पोलिस कारवाई केली नाही.रविवारी दुपारी २ वा.जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फँक्टरी येथिल टग्या क्लबवर छापा मारुन मोठ्या रक्कमेसह दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतले.राहुरी पोलिस ठाण्यात नेत असताना राहुरी जवळ नगर मनमाड महामार्गावर या दहा ते पंधरा व्यक्तींना सेटमेंट करुन सोडून दिले.ते गुन्हे शाखेचे पथक पुन्हा राहुरी फँक्टरी येथे येवून थांबले. विठामाधव नाक्यावर हे पोलिस वडापाव खात बसले असताना एक राजकीय व्यक्ती व मानवअधिकारी संघटनेचा पदाधिकारी याने पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी शुटींग केली होती. त्याने पुन्हा पोलिसांची शुटींग काढली.
पोलिसांनी त्या राजकीय व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेवून तुच या क्लबचा मालक असल्याचे दाखवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दरम्यान पोलिसांनी सोडून दिलेल्या पंधरा व्यक्तींचा शोध घेवून चार ते पाच जणांना ताब्यात घेवून राहुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.राहुरी पोलिस ठाण्यात सायंकाळ उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
राहुरी फँक्टरी येथिल क्लब चालक याने स्थानिक पोलिसांना महिण्याला मोठी रक्कम देत असल्याचे सांगितले.स्थानिक पोलिसांनी गेल्या महिण्यात महिण्याच्या रक्कमेत दुपटीने वाढवली असून गुन्हे शाखेसह कोणतेही पोलिस छापेमारी करणार नाही.अशी ग्वाही त्या स्थानिक पोलिसांनी दिली होती. राहुरी पोलिस ठाण्यात शुटींग करणाऱ्या त्या राजकीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला की नाही. हे मात्र समजू शकले नाही.