[ad_1]
आजचा रविवार छत्रपती संभाजीनगर शहरासाठी व्हीआयपी मूव्हमेंटचा असणार आहे. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (२७ एप्रिल) शहरात विविध कार्यक्रमांनिमित्त दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्करोग रुग्णालयाचे विस्तारीकरण आणि लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रमदेखील शहरात पार पडणार आहे.
१ हजार पोलिसांसह अधिकाऱ्यांचा बंदोबस्त
शहरात असलेल्या व्हीआयपी मूव्हमेंटमुळे शहरभर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यासाठी एक हजार पोलिस कर्मचारी, ३ पोलिस उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त, २७ पोलिस निरीक्षक, १०० पोलिस उपनिरीक्षक असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांना मंत्र्यांची हजेरी
- दुपारी १२ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात दोन बीम युनिटचे उद्घाटन
- १२.३० ते १.३० : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महात्मा गांधी सभागृह येथे सार्वजनिक सभा
- दुपारी १.५० ते ३.४५ हॉटेल रामामध्ये राखीव वेळ
- दुपारी ४ ते ५.३० वाजता हेडगेवार रुग्णालयाचा स्थानिक कार्यक्रम
- संध्या. ५.४५ वाजता विमानतळावर आगमन आणि ६.५५ ला दिल्लीकडे प्रयाण
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यक्रम
- १० वाजता विमानतळावर आगमन
- ११ वाजता ‘मन की बात कार्यक्रम’
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांचे कार्यक्रम
- सकाळी ८.३० वाजता विमानतळावर आगमन
- ८.३० ते ११ शासकीय विश्रामगृहावर राखीव
- ११.३० वा.कर्करोग रुग्णालयातील टू बीम उद्घाटनाला हजेरी
- केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या बीम युनिटची पाहणी करताना पोलिस.
[ad_2]