[ad_1]
अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महिलांना २१०० रुपये देण्याचे कोणीही आश्वासन दिले नसल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे.
.
अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित मुलाखतीदरम्यान थोरात यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी पक्षनिरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर उपस्थित होते.
थोरात यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, २१०० रुपयांचा विषय सोडाच, पण पुढील काळात महिलांना १५०० रुपयेही मिळतील का, हा प्रश्न आहे. त्यांनी निराधार लोकांना गेल्या काही महिन्यांपासून डोल न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने कर्जमाफी आणि अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईबाबत केवळ घोषणा केल्या असून, पुढे हे सरकार २१०० रुपयांसह सर्व आश्वासने विसरून जुमला होता असे म्हणेल, अशी टीका थोरात यांनी केली.
2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही – नरहरी झिरवाळ
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? याकडे लक्ष लागले असताना आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी 2100 रुपये देण्याबाबत मोठे विधान केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचेही ते म्हणालेत. हेही वाचा
[ad_2]