[ad_1]
दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की, कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे विचारतील, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तर हा हल्ला म्हणजे सरकारचे अपयश असून त्यांनी ते स्वीकारायला हवे असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आ
.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणी काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काहीजण सांगतायत की असे काही घडलेच नाही, मुळात दहशतवाद्याला धर्म किंवा कुठलीही जात नसते.
नेमके वडेट्टीवार काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणी सरकारी लोकंकाही बोलत नाही. ते त्यांचे अपयश आहे यावर सरकारकडून काही प्रतिक्रिया दिली जात नाही. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारले असे हे लोकं म्हणत आहे. अरे पण यासाठी वेळ असतो का? कुणाच्या कानात जाऊन धर्म विचारायला वेळ असतो का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काही घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते.
सुरक्षेत चूक कशी झाली?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? 200 किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? यावर विचार केला पाहिजे. या प्रकरणात दुसरीकडे लक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे.
मोदी सरकार काय करत होतं?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहलगाम खोऱ्यात सुरक्षा कास नव्हती. तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. तर दहशतवादी देशाची सीमा ओलांडून देशात 200 किमी आत घुसले आणि हल्ला केला. यात 27 मारले गेले. हे सगळे होत असताना मोदी सरकार काय करत होतं? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकार गोंधळलेले
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अलीकडे गोंधळी सरकार आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघात जातो आणि हिंदूत्त्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम म्हणतात, की कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. दोघेही मंत्री आहेत. दोघेही जबाबदार आहेत. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पाकिस्तानचा एकही नागरीक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणतात, 107 पाकिस्तानी सापडत नाही. इतका समन्वयाचा अभाव दिसत आहे. यावरुन हे सरकार किती गोंधळलेले हे दिसत आहे.
सरकारची भेदभाव निर्माण करण्याची भुमिका
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जुना इतिहास पुसून नवीन इतिहास तयार करण्याची ताकद दाखवा. इतिहासांत जे काही घडले. ते आपण जपतो. पुढच्या पिढीला काही शिकवता येईल. इतिहास संपवणे धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखे आहे. भेदभाव निर्माण करण्याची भुमिका आहे.
[ad_2]