[ad_1]
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याला जवळपास 2 महिने होत आलेत. पण मंत्रालयात अजूनही त्यां
.
सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक झाली. प्रारंभी धनंजय मुंडे यांनी आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. वाल्मीक कराडला झालेली अटक आणि त्यानंतर त्याच्यावर लागलेल्या ‘मकोका’ नंतरही मुंडे यांनी राजीनामा दिला नाही. पण अखेर संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो सार्वजनिक झाले आणि सरकारचा नाईलाज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी 4 मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर उपरोक्त नवी माहिती समोर आली आहे.
राजीनामा दिल्यानंतरही मंत्री म्हणून नावाची पाटी का?
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला. मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सोमवारी एका पोस्टद्वारे उपस्थित केला. दमानिया यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत मंत्रालयातील एका दालनाबाहेर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे यांच्या नावाची पाटी दिसून येत आहे. दमानिया यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
कोण आहे वाल्मीक कराड?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात वाल्मीक कराड याचा मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. वाल्मीक हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. ‘ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचे पानही हालत नाही असे ते वाल्मिक कराड..’ राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे हे वाक्य चांगलेच व्हायरल झाले होते. यावरून वाल्मीक व धनंजय मुंडे यांच्यातील जवळीक स्पष्ट होते.
भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांच्याच पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अशा अनेक नेत्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कधी ‘आका’ म्हणून तर कधी थेट नाव घेऊन वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी केली होती.
हे ही वाचा…
नागपूरच्या भोसले घराण्याच्या तलवारीचा होणार लिलाव:न्यूयॉर्कची ब्रोकर कंपनी करणार लिलाव; श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची तलवार
नागपूर – नागपूरच्या भोसले घराण्याच्या ऐतिहासिक तलवारीचा न्यूयॉर्कमधील एका ब्रोकर कंपनी मार्फत ऑनलाईन लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही तलवार श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची असल्याचा दावा केला जात आहे. प्रस्तुत तलवार केव्हा अन् कशी न्यूयॉर्कच्या ब्रोकर कंपनीकडे पोहोचली? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण या तलवारीच्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी अनेक इतिहासकार व नागपुरातील भोसले घराण्याचे वंशज उत्सुक आहेत. वाचा सविस्तर
[ad_2]