Kolhapur Controversial Poster Hindu Community Appeal To Buy Asking Religion And Name | Hindu Vs Muslim | कोल्हापुरात लागले वादग्रस्त बॅनर: विशिष्ट समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा उल्लेख; शिवाजी महाराज – अफजलखानाचा दाखवला प्रसंग – Kolhapur News

0

[ad_1]

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी शहर म्हणून ओळखले जाते. पण याच कोल्हापुरात आता पहलगाम हल्ल्यानंतर एका विशिष्ट समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे वादग्रस्त बॅनर लागलेत. या बॅनरमुळे स्थानिक अल्पसंख्याक नागरिक व व्यावसायिकांत घबराटीचे वातावरण पसरल

.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गत 22 एप्रिल रोजी भयंकर अतिरेकी हल्ला झाला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह एकूण 26 पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्यातील काही प्रत्यक्षदर्शींनी अतिरेक्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्याचा दावा केला आहे. यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात उपरोक्त वादग्रस्त पोस्टर लावण्यात आले आहे.

दहशतवाद असाच संपवावा लागतो

यासंबंधीच्या माहितीनुसार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केटपुढे सदर वादग्रस्त पोस्टर लावण्यात आले आहे. 400 वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले, आणि आजही 27 लोकांना धर्म विचारूनच मारले. काहीच बदलले नाही… म्हणून तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा. 100% आर्थिक बहिष्कार, असे या पोस्टरवर पहलगाम हल्ल्याचा दाखला देत नमूद करण्यात आले आहे. या मजकुराच्या खाली सकल हिंदू समाज असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा काढलेल्या कोथळ्याचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. या फोटोवर दहशतवाद असाच संपवावा लागतो, असे नमूद करण्यात आले आहे.

हे पोस्टर कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत लावण्यात आले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर मुस्लिम समाजाचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. पण त्याचा रोख मुस्लिमांकडेच असल्याचे स्पष्ट होते. हे वादग्रस्त बॅनर ज्या ठिकाणी लावण्यात आले आहे, त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. पण या बॅनरमुळे आत्ता त्यांच्यात आर्थिक दहशत निर्माण झाली आहे.

नीतेश राणे यांनी केले होते वादग्रस्त आवाहन

उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेला धर्म विचारून दुकानात खरेदी-विक्री करण्याचे आवाहन केले होते. हिंदू समाजाने दुकानदारांचा धर्म विचारून वस्तू खरेदी कराव्यात. एखाद्या दुकानदाराच्या धर्मविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावावी, असे ते दापोली येथील एका सभेत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते.

आमदार रईस शेख यांनी केली होती टीका

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत नीतेश राणेंचा धार्मिक द्वेष पसरवणे हा धंदा असल्याचा आरोप केला होता. पहलगाममध्ये पर्यटकांचा जीव वाचवताना अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडलेला सय्यद आदिल कोण होता? हे राणेंनी सांगावे, असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता. देशातील एकाही मुसलमान अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याचे समर्थन करत नाही. पाकिस्तानविरोधात केलेल्या भारताच्या कृतीला मुस्लिमांचा पाठिंबा आहे. हल्ल्यानंतर स्थानिक मुस्लिमांनी पर्यंटकांना मोफत टॅक्सी, अन्न आणि निवासाची सोय उपलब्ध दिली. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक मशीद आणि धार्मिक स्थळांवर मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याविषयी मंत्री का बोलत नाहीत? असा प्रश्नही आमदार रईस शेख यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here