IPL 2025: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्माला पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केलीय. अलिकडेच एका मुलीने शिवालिकविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी क्रिकेटपटू फरार होता. पीडितेचा वैद्यकीय अहवाल आणि न्यायालयात तिचा जबाब नोंदवण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जोधपूरच्या कुडी पोलिस ठाण्यात शिवालिकविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिने न्यायालयात आपले म्हणणे मांडले. यासह इतर औपचारिकता पूर्ण झाल्या. यानंतर पोलिस शिवालिकचा शोध घेतला जात होता. 5 मे रोजी शिवालिक पोलिसांच्या ताब्यात आला.
लग्नाचे खोटे आश्वासन
कुडी भगतसुनी येथील सेक्टर 2 येथे राहणाऱ्या एका मुलीने आयपीएल क्रिकेटर शिवालिक शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती जोधपूर आयुक्तालयाचे एसीपी आनंद सिंह यांनी दिली. फेब्रुवारी 2023 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे मी शिवालिकला भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा आपण शिवालिकच्या संपर्कात आलो आणि आमच्यात मैत्री झाल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली.
फोनवर बोलत असताना जवळीक वाढत गेली. यानंतर दोघांचे पालक एकमेकांना भेटले. त्यानंतर दोघांच्या आणि घरच्यांच्या संमतीने साखरपुडा झाला. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर शिवालिक जोधपूरला परत आला तेव्हा आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले.
लग्नानंतरचे नातेसंबंध
नंतर दोघेही राजस्थानातील अनेक ठिकाणी फिरायला गेले. ऑगस्ट 2024 मध्ये जेव्हा पीडितेला वडोदरा येथे बोलावण्यात आले तेव्हा शिवालिकच्या पालकांनी तिला सांगितले ते ऐकून तिला धक्काच बसला. शिवालिक एक क्रिकेटपटू आहे. त्यामुळे हे संबंध पुढे चालू राहू शकत नाहीत, त्याला इतर ठिकाणांहूनही मागणी येत आहे. असे त्याचे पालक पीडितेला म्हणाले. यानंतर पीडितेने शिवालिकविरोधत गुन्हा दाखल केला.
वडोदराचा रहिवासी शिवालिक शर्मा 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो रणजी ट्रॉफीमध्ये वडोदराकडूनही खेळलाय.