Babil Khan : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खान हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. बाबिल हा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करत विविध गोष्टींविषयी बोलताना दिसतो. सध्या त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यानं धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बाबिल या व्हिडीओमध्ये रडताना दिसतोय आणि बॉलिवूड इंडस्ट्री किती वाईट आहे हे बोलतोय. त्यावेळी हे सगळं बोलताना त्यानं अनन्या पांडे, शनाया कपूर, अर्जुन कपूर, राघव जुयाल आणि सिद्धांत कपूर या कलाकारांची नावं घेतली आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला. तरी सुद्धा त्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
बाबील खाननं हे व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो म्हणाला ‘अनन्या पांडे, शनाया कपूर, अर्जुन कपूर, राघव जुयाल, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव सारथे लोकं… आणि आणखी बरिच नावं आहेत. बॉलिवूड खूप घाणेरडं आहे. बॉलिवूड खूप वाईट आहे. बॉलिवूड सगळ्यात नकली इंडस्ट्री आहे. ज्याचा मी कधी अनुभव घेतला आहे. पण काही लोकं आहेत ज्यांना बॉलिवूडला चांगलं बनवायचं आहे. हा मूर्खपणाच आहे.’
His PR is gonna have a hard time tomorrow
byu/Anxious_Scratch2449 inBollyBlindsNGossip
या व्हिडीओवर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिली आहे. एकानं त्याची बाजू घेत लिहिलं की ‘हे खूप वाईट आहे. एक नेपो किड असूनही त्याला असं वाटतंय तर दुसऱ्यांची कल्पनाच करू शकत नाही. मला आशा आहे की त्याची आई त्याच्या जवळ आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बिचारा मुलगा, त्याच्या वडिलांच्या निधनापासूनच तो संघर्ष करतोय. आशा आहे की त्याला शांती मिळेल.’
another part of the story babil had put
byu/Anxious_Scratch2449 inBollyBlindsNGossip
दरम्यान, बाबिलनं आधी त्याच्या अकाऊंटवरून सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आणि त्यानंतर बाबिलनं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटचं डिलीट करून टाकलं आहे. नेमकं बाबिलसोबत काय झालं याविषयी सगळ्यांना चिंता लागली आहे. बाबिल असं काही बोलण्याची ही पहिली वेळ नाही तर या आधी देखील त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इतर गोष्टींवर त्याची नाराजगी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : ‘दररोज 6-7 तास चौकशी, शरीरावर जखमांच्या खुणा, 28 दिवस झोपली नव्हती हृतिकची बहीण; आता स्वतःच केला खुलासा
बाबिलच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं असिस्टंट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्यानं ‘कला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2023 मध्ये त्यानं ‘द रेल्वे मेन’ या चित्रपटामध्ये काम केलं. बाबिल ‘फ्राइडे नाइट प्लान’ या चित्रपटात देखील दिसला होता. तर यंदाच्या वर्षी तो झी5 वर त्याच्या ‘लॉगआउट’ या चित्रपटामध्ये दिसला. बाबिलनं लंडनमधून शिक्षण केलं आहे.