[ad_1]
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, याला म्हणतात नेतृत्व. आता देखील पाकिस्तानला 24 तासाच्या उत्तर द्यायला हवे होते, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात कोणावर कारवाई करायची अ
.
पहलगाम हल्ला आणि काश्मीर संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मात्र सरकार असे अधिवेशन घेणार नाही. काश्मीर प्रश्नावर सरकार कोणालाही बोलू देणार नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
तुम्ही जबाबदारी लष्करावर सोडून देऊ शकत नाही
सरकारने लष्कराला मोकळीक देणे ही काही मोठी गोष्ट नाही. भारतीय लष्कर ही खूप मोठी सेना आहे. काल आपण पाहिले की, भारताने राफेल जेट खरेदी करण्यासाठी फ्रान्स सोबत 60,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. पंतप्रधानांनी लष्कराला मोकळीक दिली आहे… ते करायलाच हवे. काश्मीर हे लष्करामुळेच भारतात आहे. काश्मीरमध्ये लष्कराला मोकळीक होती तरी देखील पहलगाम हल्ला झाला. यात राजकीय नेतृत्वाची भूमिका काय आहे? तुम्ही जबाबदारी लष्करावर सोडून देऊ शकत नाही. गृहमंत्रालय जबाबदार आहे. गुप्तचर यंत्रणा काय करत होती? ती का अयशस्वी झाली? असे प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केले.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
[ad_2]