‘Just as books shape life, true friendship enriches life.’ | ‘पुस्तके आयुष्य घडवतात, तशी खरी मैत्री जीवन समृद्ध करते’: गौरवशाली इतिहासाला उजाळा देणारा सोहळा – Amravati News

0

[ad_1]

कापूस तळणी येथील निर्मला शाळेत २१ वर्षांनंतर रमलेले माजी विद्यार्थी.

.

निर्मला विद्यालयाने आजवर लाखो विद्यार्थी घडवले. शिवाय एक चांगला माणूस घडवण्याचे भाग्य आपल्या शाळेला लाभले. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी राबवलेला उपक्रम म्हणजे निर्मला विद्यालयाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देणारा सोहळा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य फादर तावमणी यांनी केले. ११८ वर्षांच्या परंपरेत प्रथमच निर्मला विद्यालय, कापूसतळणी येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. २००४ च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २१ वर्षांनंतर शाळेत परतले. पुन्हा एकदा त्या शाळेच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य फादर तावमणी, उपप्राचार्य डालके तसेच फादर सुनील, पवार, मिलिंद तायडे, धुळे, बहुरूपी, प्रमोद अंबू यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व प्राध्यापक बहुरुपी, रडके, माहुरे, बाबनेकर, लढ्ढा, कासुलकर आणि उषा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी गणेश खंडारे यांचाही सत्कार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने नितीन गिरनाळे, नितीन गणेशपुरे, मयूर पातूर्डे, प्रशांत शिराळकर, चंद्रहास्य सुलताने, दीपाली यावले, भाग्यश्री दामले, स्वाती कान्हेरकर, सुवर्णा मानकर, भूषण रायबोले, उमा खंडारे, प्रगती हरणे, उज्ज्वला अंबुलकर, अनंत मंगळे, शिशिर पाथरे, राजेंद्र खलोकार, अरविंद गावंडे, दीपाली अर्बट, राहुल दांडगे, रूपेश मोरे, अजय गादे व भास्कर शेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. बहुरूपी यांनी मैत्री या विषयावर सुंदर कविता सादर केली. मैत्री म्हणजे आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जशी पुस्तके आपले आयुष्य घडवतात, तशी खरी मैत्री आपले जीवन समृद्ध करते, असे मत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींमध्ये हरवून जात शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील खेळ, वार्षिक स्नेहसंमेलन यासारख्या कार्यक्रमांना उजाळा दिला. सदानंद गावंडे आणि अमोल तायडे यांच्या सुमधुर गाण्यांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ठाकरे आणि अपर्णा चाबुकस्वार यांनी केले, तर आभार निकिता करुले यांनी मानले, असे कळवण्यात आले.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here