Deven Bharti Appointed New Commissioner Of Police In Mumbai | Vivek Phansalkar | मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी देवेन भारती: विवेक फणसाळकर यांची घेणार जागा; राज्याच्या राजधानीतील कायदा सुव्यवस्था सांभाळणाचे आव्हान – Mumbai News

0

[ad_1]

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची जागा घेतील. फणसाळकर आज पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत.

.

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त आहेत. त्यांनी 30 जून 2022 रोजी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. सरकारने बुधवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार, त्यांची आता मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हे आज आपल्या 2 वर्षांच्या कारकिर्दीनंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त होणार आहेत. देवेन भारती हे त्यांच्याकडून आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारतील.

उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तपद हे पोलिस दलात अत्यंत मानाचे मानले जाते. त्यामुळे विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर हे पद कुणाला मिळणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलिस अधिकारी अर्चना त्यागी आदी बड्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. पण देवेन भारती यांनी या सर्वांवर वरचढ ठरले.

कोण आहेत देवेन भारती?

55 वर्षीय देवेन भारती हे मूळचे बिहारच्या दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंड येथून मॅट्रिक केली. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन-9 व डीसीबी गुन्हे शाखा म्हणूनही काम केले आहे. त्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा व त्यानंतर सह पोलिस आयुक्त (कायदा सु्व्यवस्था) पदावरही काम केले आहे. ते पोलिस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था) व महाराष्ट्र एटीएसचेही प्रमुख होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून करण्यात आली होती.

1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी पोलिस सहआयुक्त (कायदा सु्व्यवस्था) म्हणून कर्तव्य पार पाडले होते.

हे ही वाचा…

मनोज जरांगेंचे पुन्हा ‘चलो मुंबई’:मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला उपोषण सुरू करणार; शेतकऱ्यांना कामे उरकण्याचे आवाहन

जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली. 29 ऑगस्ट रोजी मी मुंबईत उपोषणाला बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. ते तिथे मला फक्त नेऊन सोडण्यासाठी आले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here