Attempted murder by stabbing three people in Bhavani Peth | पार्किंगवरून वाद भडकला: भवानी पेठेत तिघांवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न; सात जणांना अटक – Pune News

0

[ad_1]

चाकूने वार करून तिघांवर खुनी हल्ला करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार भवानी पेठेतील हरकानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली. दहशत पसरविणार्‍या दहा ते बारा जणांच्या टोळक्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना याप्रकरणी अटक करण्यात

.

रिहान शेख (18), हुसेन शेख (38), नफीसा शेख (35), रूकसार शेख (37), शाहीन शेख (54), आफरीन शेख (35), तब्बसूम शेख (56) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन महिन्यापूर्वीच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी भवानी पेठेत राहणार्‍या एका 38 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. दि. 30 एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा आयान हा त्याची दुचाकी ही हरकानगर येथे पार्क करून त्यावरील टिव्ही उतरवत होते. त्यावेळी येथे पार्किंग करायची नाही असे आरोपींपैकी एकाने म्हणून फिर्यादी यांना हटकले. नंतर त्यांच्याकडील दुचाकीला लाथा मारून खाली पाडून त्यांना मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांचे नातेवाईक व मुलगा आयन असे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशिर जमाव जमवून फिर्यादी यांचा भाऊ रिझवान यांना मारहाण केली. तसेच मुलगा आयान याच्यावर चाकुने वार करत खुनाचा प्रयत्न केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हर्षल कदम करत असून त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here