Pune Accident Woman dies after being hit by PMP bus in Kharadi | खराडीत पीएमपी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू: रस्ता ओलांडताना दिली धडक, चालकावर गुन्हा दाखल – Pune News

0

[ad_1]

भरधाव वेगाने जात असलेल्या पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पुणे नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी पीएमपी बस चालकाविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

.

महानंदा मुंजाजी आरसुळ (वय ७१, रा. खराडी गावठाण, नगर रस्ता) असे मयत झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पीएमपी बस चालकाविरुद्ध हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरसुळ यांचा मुलगा मारोती (वय ३५) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानंदा आरसुळ खराडी येथील ब्ल्यू बेरी चौकातून पायी जात होत्या. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या आरसुळ यांना भरधाव वेगात जात असलेल्या पीएमपी बसने जोरात धडक दिली. बसच्या भीषण धडकेत गंभीर जखमी झालेल्या आरसुळ यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक मोनाली भदे पुढील तपास करत आहेत.

कोथरूड परिसरात पौड रस्त्यावरील चांदणी चौकात मंगळवारी पीएमपी बसचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले. ब्रेक निकामी झालेल्या पीएमपी बसने रस्त्याच्या कडेला लावलेल्या चार ते पाच वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला होता.

पीएमपी प्रवासी महिलेचे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरीस

बुलढाणा जिल्ह्यातील मूळची राहणारी महिला पीएमपी प्रवास करत असताना तीच्या बॅग मधून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एक लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सदर महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी भोसरीत आलेल्या होत्या. त्या भोसरी ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसमधून त्या प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या बॅग मधून सोन्याचे दागिने आणि रक्कम असा एक लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. पुणे स्टेशन परिसरात त्या पीएमपी बसमधून उतरल्या. तेव्हा बॅग मधून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम पुढील तपास करत आहेत.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here