[ad_1]
सायबर चोरट्यांकडून शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवत ५५ लाखांची ऑनलाईन फसणवूक
.
पुणे, प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असून पुण्यातील दोन जणांना शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने ऑनलाईन ५५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खडक आणि वारजे पोलीस ठाण्यात अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आलेला आहे.
खडक पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदार भवानी पेठेतील टिंबर मर्चंट काॅलनीत राहतात. अनोळखी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी वेळेत चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. इतराना कशाप्रकारे लाभ मिळत आहे असे भासवून सुरुवातीला पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा देत विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यापाऱ्यााने वेळोवेळी ३८ लाख २४ हजार रुपये गुंतविले. मोठ्या प्रमाणावर रकम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे पुढील तपास करत आहेत.
अशाच प्रकारे कर्वेनगर भागातील एका ५३ वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी १७ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चोरट्यांनी वेळोवेळी रकम बँक खात्यात जमा करुन घेतली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील शुक्रवार पेठेत भरदिवसा घरफोडी
भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवार पेठेतील एका सोसायटीत घडली आहे.याबाबत संबंधित नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शुक्रवार पेठेतील शांतीकुज सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (२९ एप्रिल) सकाळी साडेदहाच्या सुमारास ते फ्लॅट बंद करुन कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी फ्लॅट कुलूप तोडले. कपाटातील दोन लाख २६ हजार रुपयांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास ते कामावरुन घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करत आहेत.
[ad_2]