Huge irregularities in Pik Vima Yojana says Manikrao Kokate | पीक विमा योजनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार- माणिकराव कोकाटे: चुकीच्या लोकांमुळे चांगल्या योजनेला गालबोट, दादा भुसेंची प्रतिक्रिया – Nashik News

0

[ad_1]

गेल्या काही दिवसांत पीक विमा योजनेत झालेला घोटाळा लक्षात घेता सरकारने आता या योजनेत काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला पीक विमा योजनेत गैरप्रकार निदर्शनास आले असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. यामुळेच एक

.

माणिकराव कोकाटे म्हणाले, पीक विमा योजनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार राज्य शासनाच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या योजनेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वीसारखीच योजना सुरू राहील. परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, तसेच गरज पडली तर अधिकची गुंतवणूक करण्यासही सरकार तयार आहे. शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळे पाऊल राज्य शासनाने उचलले आहे.

चुकीच्या लोकांमुळे एक रुपयात पीकविमा योजनेला गालबोट

तर, चुकीच्या लोकांमुळे एक रुपयात पीक विमा योजनेला गालबोट लागले असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. दादा भुसे म्हणाले, आपण बघितले असेल की शेतकऱ्यांच्या नावाने अनेक गैरव्यवहार इतर चुकीच्या लोकांनी केलेले आहेत. अगदी एनए प्लॉट असेल, गावठाण जमीन असेल. खरे म्हणजे या चुकीच्या लोकांमुळे या चांगल्या योजनेला गालबोट लागले आहे.

हजारो कोटी रुपयांचा अपव्यव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पीक विमा योजनेविषयी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात पीक विमा योजना चालवत होते, त्या योजनेत अनेक घोटाळे पाहायला मिळाले. आपण एका रुपयात पीक विमा योजना चालू केली होती. या योजनेनंतर लाखो बोगस अर्ज आलेले पाहायला मिळाले. हजारो कोटी रुपयांचा अपव्यय होतो आहे. लोकांनी षडयंत्र केले. त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये, हा विचार करून पीक विमा योजना सुधारित पद्धतीने लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here