[ad_1]
अवैधरीत्या गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या तीन तरुणासह एका महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे (वय २०, रा.दुर्गानगर कॉलनी तुमसर), आकाश रमेश महालगावे (वय २७, रा.अभ्यंकर नगर, तुमसर),
.
पत्नीला त्रास देणाऱ्या तिच्या प्रियकराचा काटा काढण्याकरता निघालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन जिवंत काडतूस आणि एका पिस्तुलासह एलसीबी पथकाने मानेगाव/सडक येथील पाल ढाब्यावर पकडले. पोलिसांना बघून कारमधील युवकांनी हातातील पिस्तूल लपवण्याची झटापट करताच एक मिस फायर झाले. यात कोणी जखमी झाले नाही. दरम्यान ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते साडेसात वाजताच्या सुमारास मानेगाव येथील पाल ढाब्यावर आरोपींची झडती घेतली. त्यावेळी एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसे असे बेकायदेशीररीत्या व विनापरवाना मिळून आले. एलसीबीच्या पथकाने चौघांना अटक केली असून या सगळ्या प्रकारामुळे भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील आकाश महालगावे याचा काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील इटखेडा ता. अर्जुनी/ मोरगाव येथील नुतन संजय भोयर या तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतरही संबंधित तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार फोन करून आणि मेसेज करून त्रास देत होता. यामुळे विवाहित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. पत्नीला त्रास देणाऱ्या त्या युवकाला धडा शिकवण्यासाठी पतीने आपल्या दोन मित्रांसह गोंदियाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गोंदियाकडे निघण्याआधी हे तिघे मानेगाव येथील पाल ढाब्यावर थांबले होते. त्याचवेळी एलसीबीचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी कारची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता कारमधील युवकांनी पिस्तूल लपवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत एक गोळी मिस फायर झाली, मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस, एक रिकामे काडतूस, चार मोबाईल फोन आणि कार असा एकूण ७ लाख ५० हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात कलम ३/२५ (१- बी) (A),७/२५ (१) (a), ७/२५ (९) ,२७ भारतीय हत्यार कायदा, सहकलम ३ (५) भारतीय न्याय संहिता, कलम १४२ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून प्रथमश्रेणी न्यायालय लाखनी येथे हजार केले असता तिन्ही पुरुष आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर महिला आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चीलांगे करीत आहेत.
ब्लॅकमेलींगच्या प्रकरणातून रचला होता कट
आकाश उर्फ कृष्णा रमेश महालगावे, याच्या दोन महिन्याच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन दोन आठवड्यापूर्वी मंदिरात लग्न झाले. परंतु त्याच्या पत्नीचा जुना बॉयफ्रेंड तन्मय मेंढे, रा. गोठनगाव हा तिला वारंवार फोन करुन ब्लॅकमेल करायचा. त्याला धडा शिकवण्याकरता नागपूर येथून तिला बोलावून घेतले व तडीपार असलेला गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे, याच्या जवळ असलेली पिस्टल घेऊन अनिकेत उर्फ रितीक अर्जुन बांन्ते, यांच्या सोबत तन्मय मेंढे, याचा काटा काढण्याच्या उद्देशाने चौघेही गोठनगाव, जि. गोंदीया येथे निघाले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आकाश महालगावे, गौरव राखडे व अनिकेत बांन्ते हे खून, दरोडा, खूनाचा प्रयत्न व दंगा करण्याचे सक्रीय आरोपी आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, भंडाराच्या सतर्कतेने अशा आरोपींकडून मोठा घातपात होण्यास टाळले.
आरोपींमध्ये तडीपार आरोपाचाही सहभाग
या प्रकरणातील आरोपी गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे (20, रा. दुर्गा नगर कॉलनी तुमसर) याचा तुमसर येथील एका हत्याकांडात सहभाग असल्याची माहिती आहे. आरोपी राखडे हा जिल्ह्यातून हद्दपार असून त्याने पोलिस अधीक्षकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलिस हवालदार प्रदीप डहारे यांच्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ad_2]