Pratap Sarnaik Announce Big Recruitment Soon in ST Mahamandal | Sarkari Naukari | Governmet Job | ST Mahamandal Job | एसटी महामंडळात लवकरच बंपर नोकरभरती: संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नोकरभरतीला मान्यता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती – Mumbai News

0

[ad_1]

एसटी महामंडळात लवकरच नोकरभरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांसोबत काही रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आगामी काही वर्षात एसटी महामंडळ 25 हजार स्वमालकीच्या बस घ

.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307 व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here